Psalms 43

1हे देवा, तू माझा न्याय कर, आणि भक्तिहीन राष्ट्राविरूद्ध तू माझा बाजू मांड,
2कारण तू माझ्या सामर्थ्याचा देव आहेस;
तू मला का दूर केले आहे?
शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करत फिरू?

3अहा! तू आपला प्रकाश आणि सत्य पाठवून दे, ते मला चालवोत.

तुझ्या पवित्र डोंगराकडे आणि मंडपाकडे ते मला मार्गदर्शन करोत.
4तेव्हा मी देवाच्या वेदीजवळ,
देव जो माझा मोठा आनंद आहे, त्याकडे जाईल,
आणि हे देवा, माझ्या देवा, वीणा वाजवून मी तुझी स्तुती करीन.

हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस?

माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस?
देवाची आशा धर, कारण जो माझी मदत आणि माझा देव
त्याची मी आणखी स्तुती करेल.
5

Copyright information for MarULB